Santosh Deshmukh Case : बीड सरपंचाच्या हत्येचा ‘आका’, देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?

| Updated on: Dec 20, 2024 | 10:39 AM

बीडच्या सरपंच हत्येच्या प्रकरणावरून वाल्मिकी कराडच्या अटकेसाठी विरोधक आक्रमक आहेत. हत्येचा आका मंत्रिमंडळात असून त्याची हकालपट्टी करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिल्याचे पाहायला मिळाले.

हिवाळी अधिवेशन सुरू असताना सलग चौथ्या दिवशी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विरोधक सभागृहात चांगलेच आक्रमक झालेत. बीडच्या सरपंच हत्येच्या प्रकरणावरून वाल्मिकी कराडच्या अटकेसाठी विरोधक आक्रमक आहेत. हत्येचा आका मंत्रिमंडळात असून त्याची हकालपट्टी करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिल्याचे पाहायला मिळाले. मस्साजोगच्या घटनेवर बोलणार म्हणत खंडणीवरून फडणवीसांना थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, वाल्मिक कराडला अटक न झाल्यास बीडमध्ये लोक रस्त्यावर उतरतील, असा इशाराच आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला. पवनचक्कीच्या दोन कोटी रूपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये हस्तक्षेप केल्याने राक्षसी कृत्याप्रमाणे संतोष देशमुखांचा जीव घेतला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही अतिरक्तस्त्रावाचा उल्लेख आहे. संतोष देशमुख यांची छाती, डोकं, हात-पाय, चेहऱ्यावर जबर मारहाण करण्यात आली आहे. चेहरा, डोळ्यांचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडला होता. संतोष देशमुख यांचा मृत्यू हॅमरेड अॅण्ड शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिजमुळे झाला आहे, असं रिपोर्टमधून समोर आले आहे.

Published on: Dec 20, 2024 10:39 AM