पंकजा मुंडेंसह बजरंग सोनवणेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण काय?

| Updated on: May 23, 2024 | 12:21 PM

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणूक काळातील प्रचारादरम्यान झालेल्या खर्चात तफावत आढळून आल्याने निवडून आयोगाने नोटीस बजावली आहे

Follow us on

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांना नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणूक काळातील प्रचारादरम्यान झालेल्या खर्चात तफावत आढळून आल्याने निवडून आयोगाने महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी नोटीस जारी केली आहे. तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अभिलेख सादर करून तपासणी करून घ्यावे असे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी आदेश काढले आहेत. 3 मे ते 10 मे या कालावधीत एकूण 20 लक्ष 94 हजार 40 रुपये एवढ्या रक्कमेची तफावत आढळून आल्याने पंकजा मुंडे यांना नोटीस बजाविण्यात आली आहे.