भरपावसात पंकजा मुंडेंची तुफान बॅटींग; म्हणाल्या, तुम्ही माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर…

| Updated on: Apr 29, 2024 | 5:20 PM

पाऊस कोसळत असला तरी पंकजा मुंडेंनी पावसात जोरदार बॅटींग केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांना आवाहन केलं. असाच मताचा पाऊस तुम्ही माझ्यावर पाडा. मी तुमच्यावर विकासाचा पाऊस पाडेल. मला एकदा संसदेत पाठवा. मी बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करेल, असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं

महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा निवडणुकीसाठी बीडच्या नाळवंडी गावात पंकजा मुंडेंनी जाहीर सभा घेतली. यावेळी पावसाने देखील हजेरी लावली होती. पाऊस कोसळत असला तरी पंकजा मुंडेंनी पावसात जोरदार बॅटींग केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांना आवाहन केलं. असाच मताचा पाऊस तुम्ही माझ्यावर पाडा. मी तुमच्यावर विकासाचा पाऊस पाडेल. मला एकदा संसदेत पाठवा. मी बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करेल, असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं. तर भाषण सुरू असताना पाऊस आला म्हणजे बीड जिल्ह्याच्या उज्वल भविष्याचा संकेत आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. पुढे त्या असंही म्हणाल्या, विरोधाकडे सध्या मुद्दा नाही. त्यामुळे तुमचं मत वाया घालू नका. बीड जिल्ह्याला विकास काय असतो, हे मी दाखवून दिलं आहे. जात-पात धर्म सोडून मला मतदान करा. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी माझ्यासाठी आणि माझ्या परिवारातील कोणासाठी मत मागायला येणार नाही.

Published on: Apr 29, 2024 05:20 PM
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
ठाकरेंच्या 13 आमदारांपैकी किती आमदार अन् खासदार संपर्कात? उदय सामंतांनी थेट आकडाच सांगितला