तरच मतदान करणार… बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

| Updated on: May 13, 2024 | 10:14 AM

चौथ्या टप्प्यात 11 जागांवर म्हणजेच नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी, बीड या ठिकाणी मतदान होणार आहे. अशातच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मतदारांनी मतदान करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. काय आहे कारण? बघा व्हिडीओ

आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. या चौथ्या टप्प्यात 11 जागांवर म्हणजेच नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी, बीड या ठिकाणी मतदान होणार आहे. अशातच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मतदारांनी मतदान करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. केज तालुक्यातील कोरडेवाडी गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. केज तालुक्यातील साठवण तलावाच्या प्रश्नावरून मतदारांनी हा बहिष्कार घातला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी गावात 2 हजार 130 मतदार आहेत. साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावा तरच मतदान करणार, असा ग्रामस्थांचा पवित्रा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासन या मतदारांच्या मागणीवर कोणती भूमिका मांडणार? ग्रामस्थांची प्रश्न सोडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: May 13, 2024 10:14 AM
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं…