‘अन्यथा मी स्वत:ला संपवून टाकेन’, बजरंग सोनवणे निवडणूक अधिकाऱ्यावर भडकले

| Updated on: Jun 02, 2024 | 5:30 PM

“कांबळे साहेब हात आकडू नका. अन्यथा मी स्वत:ला संपवून घेईन”, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांच्यावर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले इतकंच नाहीतर बजरंग सोनवणे यांनी त्यांनी धमकी देखील दिली आहे.

बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांच्यावर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले इतकंच नाहीतर बजरंग सोनवणे यांनी त्यांनी धमकी देखील दिली. बजरंग सोनवणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना स्वत:ला संपवून घेण्याची धमकी दिल्याचे पाहायला मिळाले. “कांबळे साहेब हात आकडू नका. अन्यथा मी स्वत:ला संपवून घेईन”, असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलं. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. स्ट्राँग रुमच्या पाहणीदरम्यान बजरंग सोनवणे यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, बजरंग सोनवणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. मी काय बोललो हा विषय नाही. त्यांनी लोकशाही जिवंत ठेवली नाही तर बीड जिल्हा काय म्हणेल? त्यांनी लोकशाही जिंवत ठेवावी, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली.

Published on: Jun 02, 2024 05:30 PM
Loksabha Election Exit Poll 2024 : राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, सिद्धू मूसेवाल्याच्या गाण्याचा उल्लेख करत भाजपवर निशाणा
एक्झिट पोल म्हणजे बोगस… एक्झिट पोलच्या अंदाजावर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?