Beed Case : संतोष देशमुख हत्येनंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
वाल्मिक कराडवरही मोक्का लावावा अशी मागणी करत मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून आज सकाळपासूनच पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय मुंडे हे देखील सहभागी आहेत.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला महिना उलटला. हत्येला एक महिन्यांहून अधिक दिवस उलटून गेले तरीही अद्याप सगळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले नाहीत. हत्या प्रकरणातील ८ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. परंतू यातील मास्टर माईंड असा आरोप होत असणाऱ्या वाल्मिक कराडला मात्र वगळण्यात आल्याने ग्रमास्थ आक्रमक झालेत. वाल्मिक कराडवरही मोक्का लावावा अशी मागणी करत मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून आज सकाळपासूनच पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय मुंडे हे देखील सहभागी आहेत. आज मस्साजोगचे ग्रामस्थ मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार होते. पण त्या जागी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे टॉवर शेजारी असलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांनी आंदोलन केलं आहे. आंदोलनाचं ठिकाण बदललं असलं तरी ग्रामस्थांच्या मागण्या त्याच आहेत. बघा कोणत्या आहेत मागण्या?