राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड लोकसभेचा उमेदवार ठरला? राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचं भावी खासदार म्हणून बॅनर

| Updated on: Jun 02, 2023 | 6:30 AM

VIDEO | बीडमध्ये लागलेल्या बॅनर वरून राजकीय वर्तुळात चर्चा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड लोकसभेचा उमेदवार ठरला?

बीड : सध्या बीडमध्ये लागलेल्या बॅनर वरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस यांचे भावी खासदार म्हणून बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड लोकसभेचा उमेदवार ठरला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवर भावी खासदार म्हणून उल्लेख करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघावरून दावेप्रति दावे होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी लोकसभे बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर त्यांच्या बहिण प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीला सक्षम उमेदवार मिळत नसल्याच म्हटलं. दरम्यान यानंतर हे बॅनर झळकत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा उमेदवार म्हणून अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा होत आहे.

Published on: Jun 02, 2023 06:21 AM
“राष्ट्रवादीत जास्त खदखद, जयंत पाटील आमदारांकडे लक्ष द्या”, शिवसेनेचा खोचक सल्ला
खेळाडूंवर अन्याय, देशातील पैलवान रस्त्यावर, पण…; माकप नेत्याचा मोदी सरकारवर हल्लाबोल