Beed Parli Election Result 2024 : भावानं परळीचा गड राखला… धनंजय मुंडे म्हणाले, ‘माझी बहीण पंकजा…’

| Updated on: Nov 23, 2024 | 2:10 PM

विधानसभेच्या निकालातील 18 व्या फेरीअखेर 1 लाख 19 हजाराची आघाडी घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांना पिछाडीवर टाकले. मुंडे हे विजयाच्या दिशेकडे आगेकूच करताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरूवात केली.

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाची चर्चा होती. राज्याचे लक्ष लागलेल्या परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांची या प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र धनंजय मुंडे यांनी मुंडे कुटुंबाचा गड असलेल्या परळी विधानसभेत निर्णायक आघाडी घेतली आहे. 18 व्या फेरीअखेर 1 लाख 19 हजाराची आघाडी घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांना पिछाडीवर टाकले. मुंडे हे विजयाच्या दिशेकडे आगेकूच करताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरूवात केली. यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महायुतीचे सर्व नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माझी बहीण पंकजा मुंडे यांच्यासह माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी यांनी ही विधानसभा निवडणूक हातात घेतली. जात-पात, धर्म यांच्या पलिकडे जाऊन, याचं कोणतंही राजकारण न करता विकासाच्या, कर्तृत्वाच्या मागे जनता उभे राहिली. असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आभार मानले. तर ऐतिहासिक विजयासाठी २६ व्या फेरीपर्यंत थांबावं लागेल असेही धनंजय मुंडे म्हणाले. पण आतापर्यंत आलेला निकाल हा ऐतिहासिक विजय असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

Published on: Nov 23, 2024 02:10 PM
Eknath Shinde : महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
Mahim Election Result 2024 : माहिममध्ये अमित ठाकरे अन् सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी