Trupti Desai Video : वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?; पोलिसांनी थेट…
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी बीड जिल्ह्यातील २६ पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी बीड
भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाईंचा पाय खोलात जाणार असल्याची शक्यता आहे. कारण तृप्ती देसाई यांना बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाई यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान बीड जिल्ह्यातील २६ पोलीस हे वाल्मिक कारड यांच्या मर्जीतले असल्याचा गंभीर आरोप केला होता. याच आरोपांवरून बीड पोलिसांनी तृप्ती देसाई यांना नोटीस बजावत तक्रार प्राप्त झाली मात्र पुरावे मिळाले नाहीत, असं सांगितले आहे. तर आरोप केले त्याचे पुरावे घेवून हजर राहण्यासाठी तृप्ती देसाईंना बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे. वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलीस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करा, अशी मागणी गेल्या २७ जानेवारीला तृप्ती देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. यावेळी बीड जिल्ह्यातील २६ पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोपही तृप्ती देसाई यांनी केला आहे. तर बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे काही पोलीस अधिकारी आहेत ते सर्वांच्या मर्जीने काम करतात किंवा काही मर्जीतले अधिकारी आहे त्यांची लिस्ट माझ्याकडे आहे.’, असं तृप्ती देसाई यांनी म्हटले होतं.