Beed Rain | बीडमध्ये जोरदार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला
पहिल्याच पावसाने दाणादाण उडाली असून अनेक नद्यांना पूर आला आहे. माजलगाव तालुक्यातील सिमरी, पारगाव, जिवनपूर, उमरी, देवळा आणि लोणगावचा संपर्क तुटला आहे. (Beed Rain Updates Many Village lost contact)
रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. काल सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर देखील पावसाची रिपरिप सुरूच होती. पहिल्याच पावसाने दाणादाण उडाली असून अनेक नद्यांना पूर आला आहे. माजलगाव तालुक्यातील सिमरी, पारगाव, जिवनपूर, उमरी, देवळा आणि लोणगावचा संपर्क तुटला आहे. सध्या या गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.