Beed Case : ‘तुम्ही प्लीज खाली या…’, जरांगे पाटलांनंतर DYSP कॉवत यांच्याकडून धनंजय देशमुख यांना विनवण्या अन्…

| Updated on: Jan 13, 2025 | 1:34 PM

ग्रामस्थांसह संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांचा देखील सहभाग पाहायला मिळाला. धनंजय देशमुख हे स्वत: पाण्याच्या टाकीवर चढले होते. यावेळी त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची माहिती समोर आली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन तपास सुरू असताना आता बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये ग्रामस्थांसह संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांचा देखील सहभाग पाहायला मिळाला. धनंजय देशमुख हे स्वत: पाण्याच्या टाकीवर चढले होते. यावेळी त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची माहिती समोर आली आहे. तर माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार, असा पावित्रा त्यांनी घेतला आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील घटनास्थळी दाखल झालेत. पाण्याच्या टाकीवर चढलेल्या धनंजय देशमुख यांना मनोज जरांगे पाटील यांनी खालून फोन करून त्यांची समजूत घातली पण ते मानायला तयार झाले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना वारंवार पाण्याच्या टाकीवरून खाली उतरण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली यानंतर बीडचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी देखील धनंजय देशमुख यांना फोन करून त्यांना खाली येण्याची विनवणी केली.

Published on: Jan 13, 2025 01:23 PM
Manoj Jarange : ‘…तर यांचं जीनं मुश्किल करेन’, जरांगेंचा पाण्याच्या टाकीवर चढलेल्या धनंजय देशमुखांना थेट फोन अन्…
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर पाण्याच्या टाकीवरून उतरले खाली