Javed Akhtar | पहले बुरे हुआ करते थे, अभी अँटीनॅशनल भी हो जाते है : जावेद अख्तर
94 व्या अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन आज पार पडलं. या संमेलनाला प्रमुख पाहुणे असलेले जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी साहित्य संमेलनाच्या वासपीठावरुन भाजपवर निशाणा साधला.
94 व्या अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन आज पार पडलं. या संमेलनाला प्रमुख पाहुणे असलेले जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी साहित्य संमेलनाच्या वासपीठावरुन भाजपवर निशाणा साधला. लेखक जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही बाब समाजातील काही लोकांना रुचत नाही हे योग्य नाही. आपलं परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. आता तर देशद्रोही ठरविले जात असल्याची खंत आहे, असं अख्तर म्हणाले.
साहित्य आणि राजकारण याच नातं काय हा प्रश्न नेहमीच उभा राहतो. मात्र साहित्य आणि राजकारण याच घनिष्ठ नातं असल्याचंही अख्तर यांनी सांगितलं. तसंच मराठी साहित्याच्या दरबारात येण्याची संधी मिळाली ही अतिशय आनंदाची बाब असून या मातीला मी प्रणाम करतो. मातृभाषा आपल्याला भूतकाळातून वर्तमानात आणते असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले.