लोकसभेला कोणाचे किती खासदार येणार? निवडणुकीआधीच C व्होटरचा सर्व्हे, जनतेच्या मनात नेमकं काय?
सीव्होटरने एक सर्व्हे केल्या यानुसार महाविकास आघाडी मुसंडी मारेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४५ हून अधिक जागा लोकसभेच्या निवडणुकीत जिंकणार असा भाजपचा दावा आहे तर महाविकास आघाडीत किमान ४० जागा जिंकणार असा दावा केला
मुंबई, २६ डिसेंबर २०२३ : लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार कामाला लागली आहे. साडेचार महिन्यातच लोकसभा निवडणुका आहेत. त्याआधी सीव्होटरने एक सर्व्हे केल्या यानुसार महाविकास आघाडी मुसंडी मारेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४५ हून अधिक जागा लोकसभेच्या निवडणुकीत जिंकणार असा भाजपचा दावा आहे तर महाविकास आघाडीत किमान ४० जागा जिंकणार असा दावा आहे. त्यावेळी सीव्होटरचा एक सर्व्हे समोर आलाय. यानुसार महाराष्ट्रात महायुतीवर महाविकास आघाडी भारी पडेल. महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. त्यानुसार महायुतीला १९ ते २१ जागांचा अंदाज आहे. महाविकास आघाडीला २६ ते २८ जागांचा अंदाज आहे. इतरांना ० ते २ अशा जागा मिळण्याचं भाकित आहे. म्हणजे सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे समोर आले आहे.
Published on: Dec 26, 2023 12:37 PM