Special Report | कोर्टाच्या ‘त्या’ निकाला आधी बंद दाराआड बैठक, काय झाली तिघांमध्ये चर्चा

| Updated on: May 02, 2023 | 7:45 AM

VIDEO | सत्तासंघर्षाच्या निकालाआधी अमित शाह यांची शिंदे-फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा, बैठकीचं कारण काय? बंद दाराआड शिंदेंना काय सांगितल?

मुंबई : मुंबईत रविवारी झालेल्या एका बैठकीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत एक महत्वपूर्ण बैठक घेतली. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपच्या नेतृत्वानं आगामी निवडणुकीसाठी विश्वास व्यक्त केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली. अमित शाह रविवारी, एका दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. याचवेळी बंद दाराआड महत्वपूर्ण बैठक झाली. भाजपचे आमदार पराग अळवणींच्या घरी बैठक झाली. जवळपास एक तास अमित शाह, शिंदे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली.

आगामी सर्व निवडणुका मुख्यमंत्री शिंदेंच्याच नेतृत्वात लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. येत्या 15 दिवसांत सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातला निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या निकालाआधी अमित शाहांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. सत्तासंघर्षाचा निकाल बाजूने आला तर पुढची वाटचाल कशी असावी? सत्तासंघर्षाचा निकाल विरोधात गेल्यास काय करायचं? 16 आमदार अपात्र झाले तरी बहुमत सरकारकडे असणारच, त्यामुळे तर पुढचा मुख्यमंत्री कोण? यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: May 02, 2023 07:41 AM
‘भाजपची नजर चिनी’, संजय राऊत यांचा आशिष शेलार यांना नेमका काय टोला?
Special Report | उदय सामंत अन् शरद पवार यांच्यात भेटींवर भेट, फक्त बारसूसाठी ३ बैठका की आणखी काही?