पुण्यात बॅनरबाजी, पोटनिवडणुकीआधीच प्रशांत जगताप भावी खासदार? बॅनरवर नक्की लिहिलंय तरी काय?
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून पुण्यात झळकले बॅनर्स, काय आहे बॅनरवरील आशय
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून शहरात बॅनर्स झळकले आहेत. पुण्यातील वडगाव भागात हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. याआधीही प्रशांत जगताप यांचे भावी खासदाराचे बॅनर्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, मात्र आता प्रत्यक्षात बॅनर्स लावण्यात आले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात अद्याप पोटनिवडणुक जाहीर झालेली नसतांना पोटनिवडणुकीआधीच प्रशांत जगताप यांना भावी खासदार केल्याची चर्चा या बॅनरमुळे होताना दिसतेय. तशी पुणे शहरात जोरदार बॅनर्सबाजी करण्यात आल्याचेही पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यानंतर पुण्यातील खासदारकीची जागा रिक्त झाली. या जागेसाठी कुणाला उमेदवारी देण्यात येणार याविषयी चर्चा असताना भावी खासदार असा उल्लेख करत भाजपचे नेते जगदीश मुळीक यांच्या नावाचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर प्रशांत जगताप यांच्या नावाचा भावी खासदार म्हणून उल्लेख असलेले पोस्टर समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.