अन् कामाला लागा, दवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना काय दिल्या सूचना?

| Updated on: Mar 25, 2024 | 2:28 PM

अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुती काम करा... अंतर्गत मतभेदांवरून महायुतीच्या उमेदवारावर परिणाम होता कामा नये, बारामती, अहमदनगरबाबत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे. तर दुसरीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांच्या विरोधात राम शिंदे यांनी भूमिका घेतल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील वाद पक्ष पातळीवर मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहे. याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीचा सपाटा लावला आहे. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुती काम करा… बारामती, अहमदनगरबाबत झालेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुढे असेही म्हटले की, महायुतीचा उमेदवार विजयी होईल तेवढं बघा, अशाही सूचनाही फडणवीस यांनी दिल्यात. अंतर्गत मतभेदांवरून महायुतीच्या उमेदवारावर परिणाम होता कामा नये, मिशन ४५ अधिक यावरच संपूर्ण लक्ष ठेवा असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 25, 2024 02:28 PM
सिल्वर ओकला वळसा? वर्षावर जानकरांचा जलसा, मविआच्या उंबऱ्यापर्यंत गेलेले जानकर महायुतीत
आपलं स्वागत… प्रणिती शिंदेंचं भाजप लोकसभेचे उमेदवार राम सातपुतेंना पत्र