राज ठाकरे यांना बेळगावचे नगरसेवक रवी साळुंखे यांचं पत्र, काय म्हटलंय पत्रात?

| Updated on: Apr 19, 2023 | 2:48 PM

VIDEO | बेळगावचे नगरसेवक रवी साळुंखे यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र, काय केली मागणी

मुंबई : सीमावासियांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. असे पत्र बेळगावचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहिले आहे. महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करण्यासाठी येतायतं. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणाऱ्यांबाबत भूमिका घ्यावी, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात नगरसेवक रवी साळुंखे यांनी केले आहे. दरम्यान, यासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे रवी साळुंखे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहित मांडले असून त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. बेळगावचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी हे पत्र लिहिल्यानंतर आता राज ठाकरे या पत्राला कोणतं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Apr 19, 2023 02:48 PM
कर्नाटक निवडणूक : स्टार प्रचारकांची भाजपची यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातून कोण?
अन्न व औषध प्रशासन खात्याची चौकशीची विनंती करणारं मुख्यमंत्र्यांना पत्र; संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया