VIDEO : Mumbai Accident | मुंबईच्या दादरमध्ये बेस्ट बसचा अपघात, अपघाताचं CCTV फुटेज समोर

| Updated on: Oct 27, 2021 | 2:35 PM

मुंबईतील दादर परिसरात तेजस्विनी बसचा खूप मोठा अपघात झाला आहे. ही बस मरोळ आगाराची असल्याची माहिती आहे. मरोळ आगाराची बसमार्ग क्रमांक 22 नंबर बसचा आज सकाळी खूप मोठा अपघात झाला. दादर येथे हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बस वाहक-बस चालक तसेच 7-8 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबईतील दादर परिसरात तेजस्विनी बसचा खूप मोठा अपघात झाला आहे. ही बस मरोळ आगाराची असल्याची माहिती आहे. मरोळ आगाराची बसमार्ग क्रमांक 22 नंबर बसचा आज सकाळी खूप मोठा अपघात झाला. दादर येथे हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बस वाहक-बस चालक तसेच 7-8 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आला आहे. या फुटेजमध्ये हे दिसून येते की हा अपघात किती भीषण होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही बसने समोरील कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1 PM | 27 October 2021
VIDEO : Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये द बर्निंग बसचा थरार, PMPML बसने घेतला अचानक पेट