VIDEO : Mumbai Accident | बेस्ट बसवरील नियंत्रण सुटून अपघात, एकाचा जागीच मृत्यू, भांडुप येथील घटना

| Updated on: Aug 11, 2021 | 1:12 PM

भांडूप गाढव नाका परिसरामध्ये बेस्ट चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. 605 क्रमांकाची ही बस भांडुप रेल्वे स्थानकावरून टेंभीपाडा परिसराकडे जात होती.

भांडूप गाढव नाका परिसरामध्ये बेस्ट चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. 605 क्रमांकाची ही बस भांडुप रेल्वे स्थानकावरून टेंभीपाडा परिसराकडे जात होती. भांडुपचा गाढव नाका परिसरामध्ये भरधाव वेगात असताना बेस्ट चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या बेस्ट बसने रस्त्यावरून जात असलेल्या दोन नागरिकांना धडक दिली. या दुर्देवी घटनेत 82 वर्षाचे कुंडलिक भगत यांचा जागीच मृत्यू झाला तर 65 वर्षीय रवींद्र तिवारी हे जखमी झाले आहेत.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 11 August 2021
Jalgaon | जळगावमध्ये सोन्यात 1200 तर चांदीत 4 हजारांनी घसरण