मुंबईकरांनो तुमच्यासाठी ‘बेस्ट’ बातमी, ‘या’ ठिकाणी होणार हायटेक बस थांबा

| Updated on: Apr 07, 2023 | 10:27 AM

VIDEO | वाचनालय, बस आगमनाच्या सूचना, बसची प्रतीक्षा करताना मोबाईल चार्जिंगची सुविधा, पोस्ट पेटी, लहान मुलांची उंची मोजण्याचे साधन अशा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज बेस्ट थांबा, पण आहे कुठं?

मुंबई : मुंबईची लाईफलाईन मुंबईच्या लोकलला म्हटलं जात. यानंतर मुंबईकर बेस्ट बसला देखील प्राधान्य देताना पाहायला मिळतात. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतली बेस्ट बस चर्चेचा विषय ठरत आहे. एसी डबल डेकर बस, चलो ॲप, ऑनलाईन तिकीट यानंतर आता अत्याधुनिक स्वरूपाचा बस थांबा वरळी येथील नेहरू तारांगण येथे उभारण्यात आला आहे. यामध्ये वाचनालय, बस आगमनाच्या सूचना, बसची प्रतीक्षा करताना मोबाईल चार्जिंगची सुविधा, पोस्ट पेटी, लहान मुलांची उंची मोजण्याचे साधन अशा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज बेस्ट थांबा उभारण्यात आला आहे. या सगळ्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणारा हा बेस्ट बस थांबा सध्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे.

Published on: Apr 07, 2023 10:21 AM
खामगाव खंडोबा यात्रा महोत्सव; बारा गाड्या ओढण्याची दीडशे वर्षांची परंपरा
माफी मागा, फडणवीस मोठ्या मनाचे; भाजपच्या मोठ्या नेत्याचे ठाकरेंना आवाहन