BEST Strike | ‘बेस्ट’च्या संपामुळे मुंबईकर बेहाल; मागण्या मान्य न झाल्यानं ६ व्या दिवशी संप सुरूच

| Updated on: Aug 07, 2023 | 9:23 AM

VIDEO | बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सहाव्या दिवशीही सुरूच, मुंबईतील 18 आगारातील कर्मचारी सहभागी 

मुंबई, ७ ऑगस्ट, २०२३ | आज बेस्ट बसचा वर्धापन दिवस आहे आणि या वर्धापन दिनाच्या दिवशी बेस्ट मधील कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांकरिता संपावर गेलेले आहेत. आज संपाचा सहावा दिवस आहे. त्यामुळे मुंबईकर जनतेला प्रवास करताना खूप मनस्ताप झेलावा लागत आहे. एकीकडे बेस्टचे कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर असल्यामुळे बेस्टच्या मदतीसाठी एसटी आता धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. एसटीचे तब्बल दीडशे बसेस आता बेस्टच्या मार्गावरती चालणार आहेत. त्याच सोबत सर्व खाजगी वाहतूकदारांना बेस्ट मार्गिकेवरती टप्पा प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये परंतु आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे, आज तरी बेस्टच्या वर्धापन दिनानिमित्त या आंदोलनावरती तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर मुंबईतील 18 आगारातील कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसलेला आहे. आंदोलनची दखल प्रशासनाने अद्याप घेतली नसून कर्मचारी आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Published on: Aug 07, 2023 09:23 AM
भाजप प्रवेशाची चर्चा? आव्हाड म्हणतात ‘…शी… शी… शी… मला गंमत वाटते…’
अजित पवार गट अडचणीत येणार? शरद पवार गटाची केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका