‘तर जे झालं ते झालं…’, कोर्टाच्या निर्णयावर भगतसिंह कोश्यारी यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: May 12, 2023 | 10:06 AM

VIDEO | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासह उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर भगतसिंह कोश्यारी म्हणाले...

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काल मोठा निकाल दिला. यावेळी राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर ताशेरे ओढल्याचे समोर आले आहे. राज्यपालांनी घेतलेले निर्णय कायद्याला धरून नव्हते असे मत न्यायालयाने आपल्या निकालात नोंदवले. दरम्यान, स्वतः भगतसिंह कोश्यारी यांनी या निकालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘तर जे झालं ते झालं, न्यायालयाने दिलेल्या निकालावर कोणतीही टिप्पणी करणार नाही.’ अशी प्रतिक्रिया माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी राजीनामा दिला म्हणून मी तो स्वीकारला. एखाद्याचा राजीनामा माझ्याकडे आला, तर मी त्याला असं सांगू शकत नाही की राजीनामा नका देऊ? मी तीन महिन्यांपूर्वीच राज्यपाल पदावरून दूर झालो आहे. मी स्वत:ला राजकीय मुद्द्यांपासून दूर ठेवले आहे. तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होतं. त्यावर न्यायालयानं निकाल दिला आहे. या निकालावर जे कायद्याचे जाणकार आहेत, तेच प्रतिक्रिया देतील. मी कायद्याचा कोणताही विद्यार्थी नाहीये. मला संसदीय कामकाज माहिती असल्याचे म्हणत त्यांनी थेट आपली भूमिका मांडली.

Published on: May 12, 2023 10:06 AM
मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे यांची मोर्चे बांधणी
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, काय आहे कारण?