राजीनाम्यानंतर कोश्यारी म्हणताय, महाराष्ट्रात गुंडगिरी आणि दादागिरी…
VIDEO | राज्यपालपदाच्या राजीनाम्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य, काय म्हणाले बघा?
नवी मुंबई : महाराष्ट्रात राज्यपालपदाच्या राजीनाम्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात गुंडगिरी आणि दादागिरी आहे, तसेच चांगल्या लोकांसह महाराष्ट्रात गुंड आणि दाऊदही असल्याचे त्यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे. या विधानावरून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काल अखेर कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आणि यानंतर नवे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Published on: Feb 13, 2023 03:25 PM