जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली खोचक टीका?
छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. यासंदर्भात मंत्री भागवत कराड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत खैरे हे जनतेने नाकारलेले उमेदवार आहेत तर इम्तियाज जलील हा....
छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महायुतीतील उमेदवार अद्याप निश्चित होत नाहीय, महायुतीकडून भाजपचे भागवत कराड हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांचं पण नाव घोषित झालेलं नाही. यासंदर्भात मंत्री भागवत कराड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘चंद्रकांत खैरे हे जनतेने नाकारलेले उमेदवार आहेत. चंद्रकांत खैरे यांना जनता पुन्हा निवडून देणार नाही. त्यामुळे ते निश्चित पराभूत होतील’, असे भागतव कराड यांनी म्हटले तर पुढे ते असेही म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत छत्रपती संभाजीनगरमधून MIM चा उमेदवार निवडून येणार नाही. गेल्या वेळी हिंदू बांधवांनी केलेली चूक त्यांच्या लक्षात आली आहे. इम्तियाज जलील हा मागच्या वेळी नवा चेहरा होता. सुशिक्षित उमेदवार आहे. पण जलील हा बोलका पोपट आहे. तो फक्त बोलतो विकास काहीच करत नाही त्यामुळे इम्तियाज जलील यांनाही जनता नाकारणार आहे आणि संभाजीनगर लोकसभेत फक्त महायुतीचा उमेदवार विजयी होणार आहे’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.