अवकाळीने शेतकरी बेजार, पावसानं पिकांचं मोठं नुकसान बळीराजा हवालदिल

| Updated on: May 01, 2023 | 2:47 PM

VIDEO | भंडारा जिल्ह्यात अवकाळीचा कहर, पावसामुळे धानपिकासह भाजीपाल्याचं मोठं नुकसान, नुकसान भरपाईची बळीराजाकडून मागणी

भंडारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील जळगाव, नांदेड, अमरावती, बीड, नाशिक या जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेलं पीकं अवकाळी पावसाने वाया गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच भंडारा जिल्ह्यात आठवड्याभरातून अवकाळी पावसामुळे धानपिकासह भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं मोठ नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे केली आहे. भंडारा जिल्ह्यात आठवड्याभरापासून सतत येत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे धानपिकासह बागायती शेतीचे प्रचंड नुकसान झालंय. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर अक्षरशः वांगी आणि इतर फळं शेतातच फेकून देण्याची वेळ आली आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी शासनाने त्वरीत नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Published on: May 01, 2023 02:47 PM
अयोध्या पौळ यांनी बांगर यांना करून दिली ‘त्या’ चॅलेंजची आठवण..; काय आहे पहा चँलेज आणि काय आणलं पहा गिफ्ट
आमदार शिवेंद्रराजेंचं साताऱ्यात पारडं जड…; खासदारांना भोपळाही फोडता नाही आला