Nana Patole यांच्या PM Narendra Modi यांच्याद्दलच्या विधानाबाबत Bhandara पोलिसांकडून चौकशी सुरू

| Updated on: Jan 18, 2022 | 4:16 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) भाजपला थेट अंगावर घेत आल्याचं आपण पाहतो. नाना पटोले हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून राज्यातील काँग्रेसही चांगलीच आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) भाजपला थेट अंगावर घेत आल्याचं आपण पाहतो. नाना पटोले हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून राज्यातील काँग्रेसही चांगलीच आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे. पटोले हे भाजप आणि विरोधकांवर थेट टीका करतात. मात्र, आता पटोले यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, भाजपकडूनही पटोले यांच्या या व्हिडीओवर जोरदार हल्ला चढवण्यात आलाय. दरम्यान, नाना पटोले यांच्या मोदींबद्दलच्या विधानाबाबत भंडारा पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Nana Patole नांदेडमध्ये आल्यास त्यांना काळे फासून जोड्याने मारु, BJP चा इशारा | Nana Patole Controversy
फडणवीस यांना काशीचा काशीचा घाट दाखवू म्हणणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई व्हावी : चंद्रकांत पाटील