Bhadhara Rain | भंडारा जिल्ह्यात पावसाची बँटिंग, 34 वर्ष जुन्या ऐतिहासिक शिवमंदिरातील पिंड पाण्याखाली अन्…

| Updated on: Sep 23, 2023 | 11:28 AM

VIDEO | राज्यभरात मुसळधार पावसाची जोरदार बँटिंग, भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात असणाऱ्या 34 वर्ष जुन्या ऐतिहासिक बावडी शिवमंदिरात पाणीचपाणी, पाणी भरल्याने शिवपिंडच गेली पाण्याखाली...

भंडारा, २३ सप्टेंबर २०२३ | भंडारा जिल्ह्यात काही भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने रस्त्यांना नदीचे स्वरुप आलं आहे. तर शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर तुमसर शहरातील 34 वर्ष जुन्या ऐतिहासिक बावडी शिवमंदिरात पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या शिवमंदिरात पाणी शिरल्याने शिवपिंड पाण्याच्या खाली गेली आहे. भंडारा जिल्ह्यात काल सकाळपासूनच काही भागात मुसळधार पावसाने सुरुवात जोरदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील तुमसर शहरात ढगफुटी सदृश्य निर्माण झाल्याने सकल भागात पाणी साचल्याचे दृश्य आहे. भंडारात तुमसर मार्गावर दोन फूट पाणी वाहत असल्याने याच्या फटका येणारा जाणाऱ्या वाहनधारकांना होत आहे. तर नगरपरिषदेच्या योग्य नियोजन नसल्यामुळे सकल भागात पाणी साचल्यामुळे तुमसर शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने संतापाचे वातावरण नागरिकांमध्ये आहे.

Published on: Sep 23, 2023 11:28 AM
Ganesh Chaturthi 2023 | बाप्पासाठी कायपण ! चक्क २०० किलो टॉमेटोनं केली बाप्पाकरता सजावट
Maharashtra Rain Update | येत्या ४८ तासात मॉन्सून होणार सक्रिय, राज्यात कुठं कोसळणार मुसळधार पाऊस?