धक्कादायक ! पोषण आहाराच्या नावानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ ! निष्कृष्ट दर्ज्याच्या साहित्याचा पुरवठा

| Updated on: Aug 07, 2023 | 4:09 PM

VIDEO | शालेय पोषण आहार साहित्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ, कुठं होतोय निष्कृष्ट दर्ज्याच्या पोषण आहार साहित्याचा पुरवठा?

भंडारा, ७ ऑगस्ट २०२३ | ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, पटसंख्या वाढावी यासाठी शालेय पोषण आहार राज्य सरकारने योजना सुरू केली. मात्र भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व निमशासकीय शाळेमध्ये शालेय पोषण आहार साहित्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पोषण आहारासाठी पुरवण्यात आलेल्या तिखट, डाळ, मसाला व अन्य साहित्य निष्कृष्ट दर्जेचा असून संबंधित कंत्राद्वाराला वारंवार सूचना करूनही या संबंधित माहिती देऊनही अशाच प्रकारे शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जेच्या साहित्य पुरवठा केल्याचा आरोप भंडारा जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी केला आहे. निकृष्ठ दर्जाचा आहार पुरवठा करणाऱ्या पुरवठाधारकावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुगाची दाळ निकृष्ट असून ते जनावराच्या खान्या उपयोगी असूनसुद्धा अशी डाळ संबंधित पुरवठाधारक करीत आहे. यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना माहिती देऊन सुद्धा ते कानाडोळा करत असल्याचा आरोप शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी केला आहे. तर संबंधित पुरवठाधारकाला राज्य सरकारने ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्याच्यावर कारवाई करावी व चांगल्या प्रकारचा आहार विद्यार्थ्यांना पुरवण्यात यावा, अशी मागणी शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी केली आहे.

Published on: Aug 07, 2023 04:09 PM
BIG BREAKING | उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार?; म्हणाले, ‘मी तयार…’
My India My Life Goals | गंगा नदीचा काठ स्वच्छ करुन ती प्रदूषणमुक्त करण्यासाठी जनजागृती करणारे राजेश शुक्ला