‘बहिणीने भावाला फोन केला असता तर…’, अंधारेंच्या हेलिकॉप्टर अपघातावर शिंदेंच्या आमदाराची प्रतिक्रिया

| Updated on: May 03, 2024 | 5:03 PM

'जर बहिणीने भावाला फोन केला असता तर मी पाण्याची व्यवस्था केली असती. त्यांच्या कार्यकर्त्यांची ती जबाबदारी होती. त्यांचा नेत्यांची जबाबदारी होती की आपले स्टार प्रचारक येत आहेत त्यांची व्यवस्थित व्यवस्था करावी', ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टर अपघातावर शिंदेंच्या नेत्याची प्रतिक्रिया

Follow us on

बहिणीने भावाला फोन केला असता तर तातडीने तिथे पोहोचलो असतो, असं वक्तव्य करत शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलं आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टर अपघातावर भरत गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘जर बहिणीने भावाला फोन केला असता तर मी पाण्याची व्यवस्था केली असती. त्यांच्या कार्यकर्त्यांची ती जबाबदारी होती. त्यांचा नेत्यांची जबाबदारी होती की आपले स्टार प्रचारक येत आहेत त्यांची व्यवस्थित व्यवस्था करावी’, भरत गोगावले म्हणाले. तर मी तिला आता फोन केला होता, तिने उचलला नाही, तिला कोणतीही इजा होऊ नये ईश्वराकडे प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले. महाडमध्ये सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना आज सकाळी घडली. महाड येथून सकाळी साडे ९ वाजता सुषमा अंधारे या बारामतीकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर दाखल झाल्या होत्या. परंतु त्यापूर्वी हा अपघात झाला.