5 नेत्यांना भारतरत्न, पण त्यात बाळासाहेब अन् सावरकर नाहीत, निवडणुकांची धामधूम दुसरे काय? सरकारवर टीकास्त्र

| Updated on: Feb 09, 2024 | 11:15 PM

बाळासाहेबांना भारतरत्न मिळायला हवा, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत शिंदे सरकारकडे ही मागणी केली आहे. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील बाळासाहेबांना भारतरत्न देण्यासंदर्भात ट्वीट केले आहे.

मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४ : बाळासाहेबांना भारतरत्न मिळायला हवा, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत शिंदे सरकारकडे ही मागणी केली आहे. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील बाळासाहेबांना भारतरत्न देण्यासंदर्भात ट्वीट केले आहे. ‘हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण झाले. आधी 2 आणि आता एकदम 3 असे एका महिन्यात 5 नेत्यांना भारतरत्न ने सन्मानित करण्यात आले. पण त्यात ना वीर सावरकर ना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! खरं तर नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त 3 भारतरत्न देता येतात.मोदी यांनी एका महिन्यात 5 जणांना भारतरत्न जाहीर केले… निवडणुकांची धामधूम दुसरे काय?’, असे म्हणत भाजपवर राऊतांनी खोचक सवाल केलाय. तर कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवानी यांच्या मागोमाग आता चौधरी चरण सिंग, पी वी नरसिंहराव आणि एम एस स्वामिनाथन यांना भाररत्नने सन्मानित केले. आणखी काही नेते प्रतीक्षेत आहेत. पण मा. बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला. ज्यांच्यामुळे मोदी अयोध्येत राममंदिर सोहोळा करू शकले., असेही पुढे राऊतांनी म्हटलंय

Published on: Feb 09, 2024 11:15 PM
‘मी आंदोलनाला बसलो तर आता उठणार नाही’, जरांगे पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा
छगन भुजबळ यांचं अडनाव वाटोळं करणारा असं हवं होतं, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा डिवचलं