Video | मला मोठी जबाबदारी दिली, सर्वांचे खूप खूप आभार : भारती पवार

| Updated on: Jul 07, 2021 | 5:47 PM

मंत्रिपद मिळणार याची मला कल्पना नव्हती. मात्र, मोदींनी माझी मराठीतून चौकशी केली. कशा आहात, काय म्हणतोय महाराष्ट ? असे मोदींनी विचारले. सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेही भारती पवार म्हणाल्या.

मुंबई : महिला सशक्तिकरण हे फक्त भाषणातच नाही तर ते भाजपने प्रत्यक्षात उतरवून दाखवून दिलं आहे. मी नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. मी सर्व नेत्यांचे आभार मानते. मला मोठी जबाबदारी दिली आहे. ही मोठी जबाबदारी असून त्यासाठी काम करण्यासाठी मला देव शक्ती देवो, असे भारती पवार म्हणाल्या. तसेच मंत्रिपद मिळणार याची मला कल्पना नव्हती. मात्र, मोदींनी माझी मराठीतून चौकशी केली. कशा आहात, काय म्हणतोय महाराष्ट ? असे मोदींनी विचारले. सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेही भारती पवार म्हणाल्या.

Video | राज्यातील 4 नेत्यांना केंद्रात मंत्रिपद, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी ?
Modi Cabinet Expansion Video | नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान, समर्थक काय म्हणतात ?