भारतीय जनता पक्षाने एका सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेवर पोहोचवलं – अनिल बोंडे

| Updated on: Jun 15, 2022 | 5:09 PM

भारतीय जनता पक्षाने एका सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेवर पोहोचवलं, सिद्धिविनायकाची कृपा म्हणून आता सिद्धिविनायकाचा प्रसाद, लाडू घेऊन मी देवेंद्र जी आणि चंद्रकांत दादांकडे जातोय. या लाडूचा प्रसाद पुन्हा विधानपरिषेदेच्या वेळी मिळावा एवढंच एक मागणं केलं.

मुंबई: राम राज्य तर फक्त देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Phadanvis) आणलं असं विधान खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलंय. भारतीय जनता पक्षाने एका सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेवर पोहोचवलं, सिद्धिविनायकाची कृपा म्हणून आता सिद्धिविनायकाचा (Siddhivinayak) प्रसाद, लाडू घेऊन मी देवेंद्र जी आणि चंद्रकांत दादांकडे जातोय. या लाडूचा प्रसाद पुन्हा विधानपरिषेदेच्या वेळी मिळावा एवढंच एक मागणं केलं. संपूर्ण महाराष्ट्रात जी अंदाधुंद सुरु आहे, शेतकरी त्रासलेला आहे, विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही, परीक्षा वेळेवर होत नाहीत त्यामुळे या सुखकर्त्याने त्यांना चांगली बुद्धी द्यावी.

Published on: Jun 15, 2022 05:09 PM
सरकार त्यांच्या हातात, उपाययोजना करणं आमचं काम नाही – रावसाहेब दानवे
Supriya Sule on ED | Anil Parab, Nawab Malik यांच्यावरील ईडी कारवाईवर सुप्रिया सुळे म्हणाल्या…