Cabinet Expansion | भारती पवारांनी स्वीकारला आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाचा पदभार
मोदी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटचा विस्तार झाला असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. राज्यातून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवण्यात आलीत
मोदी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटचा विस्तार झाला असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. राज्यातून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवण्यात आलीत. यात भारती पवारांनी आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भारती पवार यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागलीय. भारती पवार यांचं नाव अचानक समोर आलं आज त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथही देण्यात आली. त्यानंतर खातेवाटपात भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याची पदभार सोपवण्यात आला आहे.