…तर शिंदे यांना हार घालणार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून भास्कर जाधव अन् संजय शिरसाट यांच्या जुगलबंदी

| Updated on: Dec 14, 2023 | 6:03 PM

मनोज जरंगे पाटील यांनी २४ डिसेंबरचा अल्टिमेट राज्य सरकारला दिला आहे. या मुद्यावरून सध्या सभागृहातील चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. तर सभागृहातील सत्ताधारी आमदार संजय शिरसाट आणि विरोधक आमदार भास्कर जाधव आज याच मुद्यावरून आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

Follow us on

नागपूर, १४ डिसेंबर २०२३ : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असून मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यात विधानभवन परिसरात जुगलबंदी पाहायला मिळाली. मराठा आरक्षणच्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात सभागृहात चर्चा घडून येत आहे. पण मनोज जरंगे पाटील यांनी २४ डिसेंबरचा अल्टिमेट राज्य सरकारला दिला आहे. या मुद्यावरून सध्या सभागृहातील चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. तर सभागृहातील सत्ताधारी आमदार संजय शिरसाट आणि विरोधक आमदार भास्कर जाधव आज याच मुद्यावरून आमने-सामने आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ डिसेंबरला मराठा आरक्षण दिलं तर त्यांना हार घालणार असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं तर याला प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटीबद्ध असल्याचे संजय शिरसाट म्हणाले. बघा कशी रंगली आरक्षणाच्या मुद्द्यावरून जुगलबंदी?