अन् भास्कर जाधव विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झाले नतमस्तक, पण का?
VIDEO | पुढील काळात विधिमंडळाच्या सभागृहात बसण्याची इच्छा नाही, असं का म्हणाले ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव; बघा व्हिडीओ
मुंबई : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्क झाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेमध्ये बोलू दिले जात नाही, यासह पुढच्या काळात सभागृहात बसण्याची इच्छा नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. सभागृहात बाहेर पडताना भास्कर जाधव यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘आता पुढचे तीन दिवस सभागृह सुरू होणार आहे. परंतु पुढचे तीन दिवस मी काही सभागृहामध्ये येणार नाही. कारण येण्याकरता कोणती इच्छा राहिली नाही. मनामध्ये अत्यंत वेदना आहेत. भास्कर जाधव हा एकही दिवस सभागृहातला चुकवत नाही. पण या वेळेला मला जाणीवपूर्वक बोलून दिल जात नाहीये, मला विषय मांडू दिले जात नाहीये, मी नियमाने बोलण्याचा प्रयत्न करतोय, हे अधिवेशन कामकाज आणि सभागृह नियमाने चालावं, कायद्याने चालावं याला सहकार्य करत आहे.’ ,असे म्हणत त्यांनी हा आरोप केला आहे.
Published on: Mar 21, 2023 04:14 PM