Monsoon Session | त्यांना परवानगी दिली कोणी, भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेवर सवाल

| Updated on: Jul 06, 2021 | 12:36 PM

विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवलीय. या प्रतिविधानसभेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत अध्यक्षांची परवानगी नसताना अशी सभा घेतलीच कशी जाऊ शकते, असा प्रश्न विचारला. तसंच त्यांचे माईक जप्त करण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे. राज्यभर भाजपचं आंदोलन सुरु आहे तर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवलीय. या प्रतिविधानसभेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत अध्यक्षांची परवानगी नसताना अशी सभा घेतलीच कशी जाऊ शकते, असा प्रश्न विचारला. तसंच त्यांचे माईक जप्त करण्याचे आदेश द्या, अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली.

विधानसभेच्या पायरीवर बसण्याचा निश्चित अधिकार आहे, तिथे घोषणाबाजी करण्याच देखील अधिकार आहे परंतु संसदीय कामकाज चालू असताना स्पीकर लावून मोठमोठ्याने घोषणा देणे आणि तश्या प्रकारचा आंदोलन करणं यासाठी अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते ती परवानगी भाजपने घेतली आहे का? जर घेतली नसेल तर असं आंदोलन करुच कसं शकतात. त्यांचा स्पीकर ताबडतोब जप्त करण्याचे आदेश अध्यक्ष महोदय आपण द्यावेत, अशी मागणी भास्कर जाधव यांनी नरहरी झिरवळ यांनी केली.

Devendra Fadnavis | हे सरकार जुलमी आणि वसुली सरकार, देवेंद्र फडणवीसांचे आरोप
Monsoon Session | विधिमंडळाबाहेर स्पीकर जप्त करा, विधानसभेतून थेट LIVE