रामटेकमध्ये काँग्रेसचा सांगली पॅटर्न, वाद पेटला; ‘सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..’, भास्कर जाधवांची जिव्हारी लागणारी टीका
काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी ठाकरेंचे उमेदवार विशाल ऐवजी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांचा प्रचार सुरू केलाय. यावरूनच ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी सुनील केदार यांना गद्दार म्हणत मारूतीच्या बेंबीतील विंचू म्हटलंय.
रामटेकमध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा सांगली पॅटर्न केलाय. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी ठाकरेंचे उमेदवार विशाल ऐवजी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांचा प्रचार सुरू केलाय. यावरूनच ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी सुनील केदार यांना गद्दार म्हणत मारूतीच्या बेंबीतील विंचू म्हटलंय. रामटेकमध्ये महाविकास आघाडीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे आहेत. मात्र इथे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांचा प्रचार काँग्रसेचे नेते सुनील केदार आणि खासदार शामकुमार बडवे उघडपणे करतायत. त्यावरून भास्कर जाधव यांनी सुनील केदार यांना गद्दार म्हणत हल्लाबोल केलाय. इतकंच नाहीतर त्यांना मारूतीच्या बेंबीतील विंचू म्हटलंय. ऐन निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना सोडून रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. रामटेकमध्ये आशिष जैस्वाल हे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. मात्र आपण उद्धव ठाकरेंचा अपमान करणाऱ्या आशिष जैस्वाल यांचा बदला घेण्यासाठीच काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे सुनील केदार यांनी म्हटलं. विशेष म्हणजे काँग्रेसने बंडखोरी केल्यानं राजेंद्र मुळक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. पण बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देण्याची सुनील केदार यांची भूमिका गद्दारी असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली.