मी ठाकरेंसोबतच पण…भास्कर जाधव यांनी भर भाषणातून बोलून दाखवली मनातली खदखद

| Updated on: Mar 11, 2024 | 11:07 AM

आपण ठाकरेंसोबत राहणार असे म्हणत असताना आपल्याला अनेकदा डावललं गेलं असल्याचं स्वतःभास्कर जाधव यांनी म्हटलंय. एकाच सभेतून ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षांतर्गत नाराजी बोलून दाखवली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट...

मुंबई, ११ मार्च २०२४ : एकीकडे ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर हे शिंदे गटात गेले तर दुसरीकडे ठाकरेंचेच आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर नाराजी दर्शवली आहे. आपण ठाकरेंसोबत राहणार असे म्हणत असताना आपल्याला अनेकदा डावललं गेलं असल्याचं स्वतःभास्कर जाधव यांनी म्हटलंय. एकाच सभेतून ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षांतर्गत नाराजी बोलून दाखवली. याच सभेतून शिंदे भाजपच्या नेत्यांना त्यांनी उत्तरही दिलं. मात्र या सगळ्याच्या अडून भास्कर जाधव यांनी शक्तिप्रदर्शन केले असल्याचे बोलले जात आहे. भास्कर जाधव आपल्या भाषणातून म्हणाले, पक्षासाठी आपण सर्व काही केले, पण पक्षाने पदे देताना आपला विचार केला नाही. मी लढतो, ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी. परंतु मला मंत्रीपद मिळाले नाही. गटनेतेपद मिळाले नाही. यापुढेही मिळणार नाही, हे माहीत आहे, अशी खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 11, 2024 11:07 AM
Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोडचा लोकार्पण सोहळा, बघा LIVE
ठाकरेंचे आमदार रवींद्र वायकर यांच्यामागे ईडी अन् त्यांची शिंदे गटात उडी?