Beed | गेवराई तालुक्यातील भेंडखुर्द पाझर तलाव फुटला, शेतीचं नुकसान

| Updated on: Sep 09, 2021 | 2:00 PM

दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यातील भेंडखुर्द येथील पाझर तलाव फुटला. तलावाचे पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टरवरील पीके अक्षरशः वाहून गेली.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यातील भेंडखुर्द येथील पाझर तलाव फुटला. तलावाचे पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टरवरील पीके अक्षरशः वाहून गेली. यंदा पाऊस चांगला आल्याने खरिपाची पीके चांगली आली होती मात्र या मुसळधार पावसाने काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. तलाव फुटल्याने उडीद, मूग, कापूस आणि फलबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. डोळ्यादेखत झालेला नुकसान पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी केलीय. नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

Wardha | घराची भिंत कोसळून पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा जखमी; वर्ध्याच्या आर्वीमधील घटना
Chhagan Bhujbal | महाराष्ट्र सदन घोटाळ्यात दिलासा मिळाल्यानंतर भुजबळ वर्षा बंगल्याव दाखल