Bhiwandi Loksabha Election Exit Poll 2024 : बाळ्या मामा की कपिल पाटील?; एक्झिट पोलचा भुवया उंचावणारा अंदाज काय?

| Updated on: Jun 01, 2024 | 10:09 PM

आरोप प्रत्यारोपामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघ येथील लढत चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले. भिवंडी मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यात चुरशीचा सामना झाला

Follow us on

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदार संघाची चर्चा जोरदार सुरू आहे. आरोप प्रत्यारोपामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघ येथील लढत चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले. भिवंडी मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष लोकसभा निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यात लोकसभा निवडणुकीचा चुरशीचा सामना रंगला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळाले होते. एकीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा हे भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधत होते तर कपिल पाटीलही त्यांना चोख प्रत्युत्तर देताना दिसले. त्या दोघांच्या लढाईत आता कोण सरस ठरणार? भिवंडीत यंदा कमळ फुलणार की तुतारी वाजणार? याची उत्सुकता असताना आलेल्या एक्झिट पोलनुसार कपिल पाटील हे आघाडीवर आहेत. तर बाळ्या मामा पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.