Bhiwandi Lok Sabha Constituency : कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडलं?

| Updated on: May 21, 2024 | 5:23 PM

भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजता पर्यंत एकूण 6 विधानसभा मतदारसंघात 56.41 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, भिवंडीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केला आहे. इतकंच नाहीतर कपिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही केला जात आहे.

राज्यात काल लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदान पार पडलं. भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजता पर्यंत एकूण 6 विधानसभा मतदारसंघात 56.41 टक्के मतदान झाले आहे.  134 भिवंडी ग्रामीण – 65.00 टक्के, 135 शहापूर – 63.57 टक्के, 136 भिवंडी पश्चिम – 53.72 टक्के, 137 भिवंडी पूर्व – 48.06 टक्के, 138 कल्याण पश्चिम –50.00 टक्के, आणि 139 मुरबाड – 59.02 टक्के मतदान झालंय. दरम्यान, भिवंडीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केला आहे. इतकंच नाहीतर कपिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील खंडूपाडा भागातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. महायुतीचे उमेदवार कपिल पाटील भिवंडीतील खंडूपाडा भागातील मतदान केंद्रावरून गेल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) या ठिकाणी दाखल झालेत. यानंतर कपिल पाटील हे मतदारांना धमकावत असल्याचा आरोपही सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केला.

Published on: May 21, 2024 05:23 PM
Pune Porsche Accident Case : पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर… पुणे अपघात प्रकरणी संजय राऊत आक्रमक