Thane | भिवंडी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा कोकण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू देत मदतीचा हात
एक हात मदतीचा या घोषवाक्या सह स्वाती कांबळे सह जावेद फारुकी,अनिल फडतरे,याकूब शेख यांच्या पुढाकाराने अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यानी ही मदत गोळा करण्यासाठी प्रयत्न केले.
कोकणात विशेषतः महाड चिपळूण भगत झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेकांचे संसार उध्वस्त झाले अख्खी गावेच्या गावे धुवून गेल्याने या भागात मदतीची नितांत गरज असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड व महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी शहर महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी शहरातून एकत्रित केलेली मदत ट्रकच्या माध्यमातून कोकण विभागात रवाना केली. तांदूळ, तूरडाळ,चणे,साखर,बिस्कीट,खजूर,पाण्याच्या बाटल्या ,महिला व लहान मुलांसाठी तयार कपडे ,चप्पल,कांदे ,लसूण,मीठ, कोलगेट ,साबण, खारी टोस्ट,सॅनिटरी नॅपकिन,फिनेल ,टॉवेल आदी जीवनावश्यक साहित्याचा समावेश या मध्ये आहे . एक हात मदतीचा या घोषवाक्या सह स्वाती कांबळे सह जावेद फारुकी,अनिल फडतरे,याकूब शेख यांच्या पुढाकाराने अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यानी ही मदत गोळा करण्यासाठी प्रयत्न केले. सायंकाळी या मदतीच्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवीत कोकण कडे कार्यकर्ते ही मदत घेऊन रवाना झाले आहेत.