मला गोळी मारली जाईल, मंत्री छगन भुजबळ यांचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Dec 13, 2023 | 6:45 PM

राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आज भुजबळ असतील. उद्या दुसरं कोणी असेल. आपण गप्प बसणार आहात का? कोणी बोलणार नाही? धिक्कार करणार नाही? असा सवाल करत काय केला मोठा दावा

नागपूर, १३ डिसेंबर २०२३ : राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. छगन भुजबळ यांनी विधानसभेत बोलताना असे म्हटले की, ‘कालपासून अचानक माझ्या घरी सुरक्षा वाढवली आहे. मी पोलिसांना विचारलं काय गडबड आहे? पोलीस म्हणाले, साहेब वरून इनपूट आलंय. भुजबळांना गोळी मारली जाईल… रिपोर्ट आहे’ असे म्हणत धक्कादायक दावा केला आहे. पुढे भुजबळ असेही म्हणाले की, मी मरायलाही तयार आहे. मराठ्यांना आरक्षण द्या आणि ही झुंडशाही थांबवा, एवढंच माझं म्हणणं आहे. आज भुजबळ असतील. उद्या दुसरं कोणी असेल. आपण गप्प बसणार आहात का? कोणी बोलणार नाही? धिक्कार करणार नाही? निषेध करणार नाही. आपण फक्त पाहणार का? हाच आज माझा महाराष्ट्राला हा प्रश्न आहे.

Published on: Dec 13, 2023 06:44 PM
मला बी आरक्षण द्या की… सबसे कातिल गौतमी पाटील हिची मागणी; आरक्षणाच्या वादात उडी
अजितदादांच्या PhD च्या ‘त्या’ वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी फटकारलं, म्हणाले….आणि तितकंच संतापजनक!