भर सभागृहात शिवीगाळ करणं आलं अंगाशी, अंबादास दानवेंवर मोठी कारवाई

| Updated on: Jul 02, 2024 | 3:38 PM

लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर निषेध ठराव मंजूर करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भूमिका मांडावी, अशी सत्ताधारी आमदारांनी मागणी केली. मात्र अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी प्रसाद लाड यांच्यावर भर सभागृहात शिवीगाळ केली.

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून सोमवारी विधान परिषदेच्या सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर निषेध ठराव मंजूर करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भूमिका मांडावी, अशी सत्ताधारी आमदारांनी मागणी केली. यामध्ये आमदार प्रसाद लाड आणि भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांचा समावेश होता. दरम्यान, अंबादास दानवे आपली भूमिका मांडत असताना सत्ताधारी आमदारांनी आरडाओरड केली. यानंतर अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी प्रसाद लाड यांच्यावर भर सभागृहात शिवीगाळ केली. मात्र भर सभागृहात शिवीगाळ करणं अंबादास दानवे यांना चांगलंच भोवलं आहे. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांच्यावर मोठी कारवाई केली. नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन केलं आहे.

Published on: Jul 02, 2024 03:38 PM
ज्यांनी जीवन संपवलं ते.. विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण… भावना गवळी भावूक; उमेदवारी मिळताच गहिवरल्या