VIDEO : Mumbai – माझी हत्या होऊ शकते, Gunratna Sadavarteचं खळबळजनक आरोप
शरद पवारयांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांचे कारण असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी कालच त्यांना ताब्यात घेतलं असून आज किला कोर्टात सुनावणी सुरु आहे. कोर्टात जाताना गुणरत्न सदावर्ते यांनी आपली हत्या होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.
माझी हत्या होऊ शकते. लोकशाहीचा गळा घोटला जातोय, असं खळबळजनक वक्तव्य एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलं. सदावर्ते यांना एसडी मार्ग पोलीस स्टेशनमधून किला कोर्टात नुकतंच नेण्यात आलं. त्याठिकाणी सदावर्ते यांच्यावरील आरोपांवरील सुनावणी होत आहे. शरद पवारयांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांचे कारण असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी कालच त्यांना ताब्यात घेतलं असून आज किला कोर्टात सुनावणी सुरु आहे. कोर्टात जाताना गुणरत्न सदावर्ते यांनी आपली हत्या होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.