मनोज जरांगे पाटलांच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरली, ‘या’ दिवशी मुंबईत धडकणार, पण कुठे?

| Updated on: Dec 23, 2023 | 5:50 PM

मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची पुढील दिशा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठ्यांच्या समक्ष ठरवली. तयारीला लागा म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह थेट राजधानी मुंबईकडे धडकणार

बीड, २३ डिसेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या २४ डिसेंबरच्या अल्टिमेटम पूर्वीची शेवटची सभा बीडमध्ये आज पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मराठ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या बीडच्या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची पुढील दिशा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठ्यांच्या समक्ष ठरवली. तयारीला लागा म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह थेट राजधानी मुंबईकडे धडकणार आहे. 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मुंबईवर जरांगे पाटील आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. जालन्याच्या अंतरवाली हून मराठ्यांचा जनसागर मुबंईला जायचं आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करणार, मला मुंबईत भेटायला या असं आवाहन मराठ्यांना केलंय.

Published on: Dec 23, 2023 05:50 PM
सरकार…. झोपू नका, बीडच्या सभेतून मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार
येडपटाला सांगा आडवंतिडवं…बीडच्या सभेतून जरांगे पाटलांनी नाव न घेता छगन भुजबळ यांना डिवचलं