Nashik | नाशिक महापालिकेच्या महासभेत मोठा गोंधळ
महापालिका निवडणूक दोन महिन्यांवर आलीय. मात्र, अजूनही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर देणे भाजप नगरसेवकांनी सुरूच ठेवले असून, त्यांनी बुधवारी तर Water Grace कंपनीच्या घोटाळ्याचे बिंग फोडले. त्यामुळे महापालिकेच्या महासभेत अभूतपूर्व गोंधळ झाला.
महापालिका निवडणूक दोन महिन्यांवर आलीय. मात्र, अजूनही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर देणे भाजप नगरसेवकांनी सुरूच ठेवले असून, त्यांनी बुधवारी तर Water Grace कंपनीच्या घोटाळ्याचे बिंग फोडले. त्यामुळे महापालिकेच्या महासभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. त्यांची उत्तरे देता-देता महापौरांच्या नाकी नऊ आले. येणाऱ्या काळातल्या संघर्षाची ही चुणूक मानले जाते आहे.
नाशिक शहरातील स्वच्छतेचे कंत्राट Water Grace कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांची लूट केल्याचे समोर आले आहे. कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावर घेतले आहे. त्यांना कागदावर प्रत्येक महिनाकाठी 20 ते 22 हजार रुपयांचे वेतन दिले. मात्र, कंत्राटदार केवळ 8 ते 9 हजार रुपये कर्मचाऱ्यांना देत आहे. याची कागदपत्रे भाजपच्या नगरसेवकांनी मिळवली आहेत. त्याच्याच जोरावर शहर स्वच्छतेच्या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप करत त्यांनी बुधवारी महापालिकेच्या महासभेत प्रचंड गोंधळ घातला. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाल्याचे पाहून त्यांना विरोधकांनी साथ दिली. त्यामुळे महासभेत आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.