Breaking | चिपी विमानतळाचं आज उद्घाटन, ज्योदिरादित्य सिंधीयांची व्हीसीद्वारे हजेरी

| Updated on: Oct 09, 2021 | 7:48 AM

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन सुरु झालेला वाद आता निमंत्रण पत्रिकेवर येऊन ठेपला आहे. चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर टाकलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला. चिपी विमानतळाचे उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन सुरु झालेला वाद आता निमंत्रण पत्रिकेवर येऊन ठेपला आहे. चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर टाकलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यावरुन नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. माणसाने किती संकुचित असावं हे यातून दिसंत, असा टोला राणेंनी लगावलाय. तर राणेंच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Published on: Oct 09, 2021 07:48 AM
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 9 October 2021
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 9 October 2021