‘एसआरए’बाबत मोठा निर्णय, निष्कासित झोपडी तीन वर्षांनी विकता येणार; जितेंद्र आव्हाडांची माहिती

| Updated on: Feb 03, 2022 | 11:17 PM

एसआरएबाबत (SRA) आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार आता झोपडी निष्कासित झाल्यानंतर ती त्यानंतर तीन वर्षांनी विकता येणार आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माहिती दिली आहे. लाखो गरीब लोकांना याचा फायदा होणार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

मुंबई : एसआरएबाबत (SRA) आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार आता झोपडी  निष्कासित झाल्यानंतर ती त्यानंतर तीन वर्षांनी विकता येणार आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhadयांनी माहिती दिली आहे. लाखो गरीब लोकांना याचा फायदा होणार असल्याचे  आव्हाड यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना आव्हाड यांनी म्हटले की, आज ‘एसआरए’बाबत एक महत्तपूर्ण आणि चांगला निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता झोपडी निष्कासित (hut evacuat) झाल्यानंतर तीन वर्षांनी ती विकता येणार आहे. याचा फायदा गोरगरीब जनतेला होणार आहे. तसेच सशुक्ल घर विकत घेण्याचा दर अडीच लाख रुपये ठरवण्यात आला आहे. यामुळे गरिबांना आपल्या हक्काचे घर घेण्यास मदत होणार आहे.

बंडातात्या कराडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल; कारवाईची शक्यता
यवतमाळमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या