VIDEO : Cruise Drug Case | ड्रग्ज प्रकरणात मोठ्या घडामोडी, साक्षीदाराचे अधिकाऱ्यांवर आरोप, वानखेडेंचा पलटवार
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंपासून आपल्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला संरक्षण द्या, अशी मागणी प्रभाकर साईल यांनी केली आहे. साईल यांनी संरक्षण मिळावं म्हणून पोलीस आयुक्तालयात धावही घेतली आहे. एनसीबीने क्रुझवर मारलेल्या धाडीतील प्रभाकर साईल साक्षीदार आहेत.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंपासून आपल्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला संरक्षण द्या, अशी मागणी प्रभाकर साईल यांनी केली आहे. साईल यांनी संरक्षण मिळावं म्हणून पोलीस आयुक्तालयात धावही घेतली आहे. एनसीबीने क्रुझवर मारलेल्या धाडीतील प्रभाकर साईल साक्षीदार आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करून एनसीबीचा भांडाफोड केला होता. त्यानंतर ते संपर्काबाहेर होते. कालही त्यांना मुंबईच्या बाहेर राहावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत.